चंद्रमोहिनी

खजुराहोच्या पार्श्वभूमीवरील नितांत सुंदर कादंबरी.

– प्रियदर्शनी तगारे


₹390.00

Description

पौर्णिमेचं चंद्रबिंब आकाशात वर सरकलं होतं. मंदिराजवळचा तालाब रुपेरी रंगानं चमकत होता. त्याच्या पाण्यात सारं आकाश उतरलं होतं.

त्या लख्ख चांदण्यात मंदिराची वास्तू स्वर्गीय भासत होती. तिकडे पाहताना रानीमाँ स्वतःच्या उरल्या नाहीत. ती केवळ हेमवती होती.

एका अपार्थिव स्वप्न भारलेल्या अवस्थेत ती मंदिरासमोर आली. त्यावरील शिल्पाकृतींकडे तिची नजर गेली. ती प्रमाणबद्ध शिल्पं पाहताना तिचं मन विस्मयानं भरून गेलं. असंख्य मानवी भावनांचं प्रतिबिंब त्यात होतं.

अशा प्रकारच्या जगावेगळ्या मंदिराचं निर्माण करणारा आपला पुत्र चंदेल वंशाचा पहिला राजा चंद्रवर्मन याच्याबद्दल तिच्या मनात अभिमान दाटला.

शिवपार्वतीचं शिल्प पाहताना तिला भावना अनावर झाल्या. शिवाच्या बाहुपाशातील सलज्ज पार्वतीला पाहतांना हुंदका अनावर झाला. तिनं मंदिराच्या भिंतीवर डोकं ठेवून अश्रूना वाट करून दिली.

Product Details

Are You a Writer?


Seagull Publishing House provides professional publishing services tailored to each author’s unique needs, offering customized packages that guide your manuscript from initial submission all the way to publication.