
Seagull Publishing House

पूर्वार्तिका
नव्या युगातील हृदयस्पर्शी कादंबरी
– आकाश बळवंते
₹325.00
Description
‘पूर्वार्तिका’… हे केवळ एका पुस्तकाचे नाव नाही, तर हा तीन जीवांचा, तीन कालखंडांचा आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या एका जळजळीत सामाजिक वास्तवाचा प्रवास आहे. हा प्रवास आहे राधेश या एका पुरुषाचा आणि त्याच्या जीवनात आलेल्या पूर्वा आणि वर्तिका या दोन स्त्रियांचा.
जेव्हा तुम्ही हे पुस्तक हातात घ्याल, तेव्हा कदाचित तुम्हाला वाटेल की ही आणखी एक साधी-सोपी प्रेमकहाणी आहे. पण थांबा! वाचायला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट मनाशी पक्की करून घ्या—हा कोणताही पारंपरिक प्रेमत्रिकोण नाही, की यात दोन स्त्रिया एका पुरुषासाठी एकमेकींशी भांडताना दिसतील.
हे पुस्तक तुम्हाला एका वेगळ्याच जगात घेऊन जाते. एका बाजूला शाळेतल्या बाकावरून सुरू झालेली, पुढे कॉलेजात फुललेली आणि शेवटी काळाच्या उदरात गडप झालेली एक हळवी कहाणी आहे; तर दुसऱ्या बाजूला विज्ञानाचा एक अद्भुत चमत्कार आणि आधुनिक समाजमन ढवळून काढणारा एक गहन विचार आहे.
ही केवळ प्रेमकथा नाही, तर एक संवेदनशील सामाजिक कादंबरी आहे. ही कादंबरी आजच्या वेगवान आणि बदलत्या युगातील ज्वलंत सामाजिक विषयांवर अतिशय संवेदनशीलतेने थेट बोट ठेवते. विज्ञानाने मानवी जीवनाला दिलेली आयव्हीएफ आणि स्पर्म डोनेशन ही देणगी आजही आपल्या समाजात एका बंद खोलीत, कमालीच्या गुपिते राखत गुपचूप चर्चिली जाते. या विषयाभोवती असलेले सामाजिक समज-अपसमज आणि एका निपुत्रिक दांपत्याची होणारी भावनिक ओढाताण कादंबरी अतिशय हळुवारपणे आणि वास्तववादी पद्धतीने आपल्यासमोर मांडते.
Product Details
- Published: [ 07 Sept – 2026 ]
- Format: Paperback
- Edition: 1st
- Pages: [192 ]
- ISBN: [978-81-998692-2-6]
- Publisher: Seagull Publishing House